सांजवार्ता ऑनलाईन Nov 17, 2018
औरंगाबाद- शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त टी.व्ही. सेंटर हडको येथे शिवसेनेच्या वतीने अभिवादन करून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाला पूर्व विधानसभा सेनाप्रमुख अनिल पोलकर, नगरसेवक मोहन मेघावाले, नगरसेविका सीमा खरात, किशोर नागरे, नगरसेवक सीताराम सुरे, संदेश कवडे, सुनिल शिसोदीया, संजय हरणे, सागर खरगे आदीजण उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची व शिवसैनिकांची उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.